श्री शशिकांत मोरे

शशिकांत मोरे यांनी गेली ३० वर्षे ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनमध्ये काम केले असून त्यांची २००९ साली हौसिंग फेडरेशनवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली. त्यापासून ते सह सचिव म्हणून फेडरेशनचे काम पहात आहेत. सहकार क्षेत्रातला त्याच प्रमाणे गृहनिर्माण सहकारी संस्थांविषयी त्यांचा ३० वर्षाचा अनुभव असून शासनाच्या सहकार विभागात त्यांची प्रशासक पॅनल व स. संस्था. निवडणूक प्राधिकरणाच्या पॅनलवर निवड केली आहे व त्यांची महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी (SEO) म्हणून निवड केली आहे.